Latest

अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांच्या खात्यात ४०३ कोटी रुपये जमा ! विखे पाटलांची महत्त्वाची घोषणा

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आलीय ! दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांची मदत जमा झाली आहे.

तब्बल ८ लाख ७ हजार २८४ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असून, एकूण ४०३ कोटी ६४ लाख रुपये थेट बँक खात्यांत वर्ग करण्यात आले आहेत.

जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने जाहीर केलेल्या आश्वासनानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत देण्यात आली आहे.

जिल्ह्यात पावसाने दिलेली ओढ, पिकांचे नुकसान, घटलेले उत्पादन आणि वाढता शेतीचा खर्च यामुळे शेतकरी अडचणीत होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात टंचाई आढावा बैठका घेऊन परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.

विशेष म्हणजे, पहिल्याच टप्प्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश झाल्याने मदत वितरणाचा मार्ग मोकळा झाला.दरम्यान, उर्वरित पात्र शेतकऱ्यांपर्यंतही मदत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, अशा सूचना विखे पाटील यांनी दिल्या आहेत. तुमच्या खात्यात ५ हजार रुपये जमा झाले का? इतर शेतकरी बांधवांपर्यंतही ही माहिती पोहोचवा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button