Latest

राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही! शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच पार्थ पवार यांनी ४८ तासांत दोनदा शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांचे विलिनीकरण होणार नाही आणि शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत, असा दावा राऊत यांनी केला. शरद पवार यांची स्वतःची विचारधारा असून ते शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांशी जोडलेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अजित पवार गटातील अनेक नेते समाधानी नसल्याचा दावा करत राऊत यांनी या गटाच्या भवितव्याबाबतही प्रश्न उपस्थित केले. राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचे भवितव्य दिल्लीतून अमित शाह ठरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button