
बिहारमधील बाहुबली आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या शाही लग्नाची सध्या देशभरात चर्चा रंगली आहे. शिवांगीच्या विवाहासाठी तब्बल १० एकर परिसरात भव्य तयारी करण्यात येत आहे. या लग्नात सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे जावयाला मिळणारे महागडे गिफ्ट!
अनंत सिंह आपले जावई ऋषिकेश कुमार यांना तब्बल दीड ते २ कोटी रुपये किमतीची लँड रोव्हर डिफेंडर कार भेट देणार आहेत. ही कार त्यांच्या घरी दाखल झाल्याची माहिती आहे. ऋषिकेश हे अमेरिकेत नोकरी करत असून त्यांनी जॉर्जिया स्टेट विद्यापीठातून एमबीए केले आहे.
२५ नोव्हेंबरला नदावां गावात हा विवाह सोहळा होणार आहे. लग्नासाठी दुबईतून सहा मॉडेल्सना बोलावण्यात आल्याची चर्चा आहे. पाहुण्यांसाठी १५० हून अधिक पदार्थांची मेजवानी असणार असून तब्बल ४ लाख पाहुणे उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राजकीय नेते, बॉलिवूड आणि भोजपुरी कलाकारांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे.





