
तुमचे हात-पाय अचानक सुन्न होतात? बोटांमध्ये मुंग्या येतात? अनेकदा आपण याकडे किरकोळ समस्या समजून दुर्लक्ष करतो. पण हीच मुंग्या येण्याची समस्या शरीरातील एखाद्या गंभीर आजाराचा संकेत असू शकते! चला तर जाणून घेऊयात यामागची पाच महत्त्वाची कारणं. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी पहिलं कारण म्हणजे डायबिटीज! रक्तातील साखर अनियंत्रित राहिल्यामुळे मज्जातंतूंचं नुकसान होतं. याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात.
दुसरं कारण म्हणजे व्हिटॅमिन बी-१२ आणि बी-कॉम्प्लेक्सची कमतरता. यामुळे नसांच्या कार्यावर परिणाम होतो.
तिसरं कारण म्हणजे मान, पाठ किंवा मणक्याच्या दुखापतीमुळे नसांवर येणारा दबाव.
चौथं कारण म्हणजे अतिप्रमाणात मद्यपान. यामुळे नसांचं आरोग्य बिघडू शकतं.
तर पाचवं कारण म्हणजे किडनी आणि लिव्हरचे विकार.
त्यामुळे वारंवार मुंग्या येत असतील तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर मग तुम्हालाही असा त्रास होतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा!





