Latest

नगरच्या कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी ! नव्या लाल कांद्याला पहिल्याच दिवशी मिळाला इतका भाव

दिवाळीच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकीकडे आनंदाची बातमी, तर दुसरीकडे निराशाजनक चित्र समोर आलंय. नेमक काय घडलंय? सांगतो. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान उपबाजारात नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली असून पहिल्याच दिवशी कांद्याला ४ हजार ११ रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळालाय.

शेतकरी शिवा तात्या पटारे आणि व्यापारी राजू शेंडे यांच्या हस्ते नारळ फोडून नवीन कांदा विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. चांगला भाव मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

मात्र, श्रीरामपूर बाजार समितीत गावरान कांद्याचे भाव काहीसे घसरले आहेत. काही गोण्यांना ४ हजार ८०० रुपये, तर इतर गोण्यांना ४ हजार ६०० रुपये भाव मिळालाय. बाजारात एकूण २ हजार ३६४ गोण्यांची आवक झाली.

कांद्याचे दर्जानुसार भाव ५०० रुपयांपासून ४ हजार ८०० रुपयांपर्यंत राहिले. तर मग मंडळी, येत्या काळात कांद्याचे भाव आणखी वाढणार की घसरणार? तुमचा अंदाज कमेंटमध्ये सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button