
रोजच्या जेवणातला भातही आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनासा झाला आहे. कारण यंदा तांदळाचे भाव चांगलेच वाढले असून, याचा सर्वाधिक फटका गरीब आणि मजूर कुटुंबांना बसतोय. नेमकं काय घडलंय? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, यंदा दुष्काळाच्या सावटामुळे भात पिकाचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. विदर्भ, नाशिकचा काही भाग आणि कोकणात भातशेती केली जाते. मात्र उत्पादन घटल्याने बाजारात तांदळाचे दर वाढले आहेत.
सध्या २५ किलो तांदळासाठी तब्बल २ हजार ४०० रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजेच ५० किलो तांदळाची किंमत थेट ४ हजार ८०० रुपयांवर पोहोचली आहे. क्विंटलचा दर ९ हजार ६०० रुपये आहे.
आधीच डाळी, तेल, भाजीपाला आणि गॅस महागलेले असताना आता तांदळानेही बजेट बिघडवलंय. मर्यादित रोजगार आणि वाढता घरखर्च यामुळे सर्वसामान्यांनी संसार चालवायचा तरी कसा?
प्रशासनाने बाजारभावांवर लक्ष ठेवण्याची मागणी होत आहे. तर मग मंडळी तुमच्या भागातही तांदूळ महागलाय का? कमेंट करून नक्की सांगा!





