Latest

सूरत-चेन्नई महामार्ग प्रकल्पात नवा ट्विस्ट…अहिल्यानगरच्या ‘या’ गावांमधील शेतकऱ्यांनी भूसंपादनाची रक्कम नाकारली

एका बाजूला विकासाच्या नावाखाली सूरत-चेन्नई महामार्ग होतोय, तर दुसरीकडे याच महामार्गासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप होत असून अहिल्यानगरच्या काही गावांमधील शेतकऱ्यांनी भूसंपादनाची रक्कम सुद्धा नाकारली आहे. नेमकं काय घडतंय ? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, राहुरी तालुक्यातील सोनगावसह सात्रळ, कानडगाव, कनगर आणि वांबोरी या पाच गावांतील शेतकऱ्यांनी भूसंपादनाची नुकसानभरपाई नाकारली आहे.

ज्या बागायती जमिनीचा बाजारभाव एकरी ५० लाख रुपये आहे, त्यासाठी सरकारकडून अवघे २३ लाख रुपये दिले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

शिवाय जमीन आणि त्यावरील घर, गोठे, विहिरी, झाडे यांची नुकसानभरपाई एकत्र मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदन दिलं.

महामार्ग संघर्ष समितीचे लक्ष्मणराव अंत्रे आणि गणेश अंत्रे यांनीही सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. तर मग मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button