Latest

नियतीचा क्रूर खेळ ! डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात, कोपरगावच्या दोन तरुणांचा जागीच तडफडून मृत्यू

येवला शहरातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. फत्तेबुरुज नाका परिसरात आज, रविवार १३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजता डंपर आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीवर असलेल्या कोपरगावमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

मृत तरुणांची नावे आसिफ नूर मोहम्मद शेख आणि सैफ रफिक शेख अशी आहेत. दोघेही कोपरगाव येथील संजयनगर परिसरातील रहिवासी होते.

दुपारच्या वेळेत झालेल्या या अपघातामुळे फत्तेबुरुज नाका परिसरात काही काळ खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.

मात्र, या अपघातामागील नेमकं कारण काय? डंपर आणि दुचाकीची धडक नेमकी कशी झाली? याबाबत अधिकृत तपशील समोर येणे बाकी आहे.

एकाच अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने कोपरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रस्त्यावर वाहन चालवताना वेग आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष किती गंभीर ठरू शकतं, हे या घटनेतून पुन्हा समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button