Latest

60 वर्षांत 9 आमदार; ‘असा’ आहे अहिल्यानगर स्थानिक स्वराज्यच्या आमदारकीचा आजवरचा इतिहास

मंडळी सध्या अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघ चर्चेत आलाय. मंडळी, 1966 ते 2026 या तब्बल 60 वर्षांच्या काळात या मतदारसंघाने अनेक ऐतिहासिक निवडणुका पाहिल्या. या काळात जिल्ह्याला 9 आमदार मिळाले आणि अनेक मोठे राजकीय उलटफेरही झाले.

पहिल्या निवडणुकीत शिक्षक चळवळीतील नेते पांडुरंग फलके विजयी झाले. त्यानंतर 1972 मध्ये मारुतराव घुले पाटील यांनी विजय मिळवला. 1978 मध्ये आबासाहेब निंबाळकर यांनी मैदान मारलं. पण 1984 मध्ये श्रीरामपूरचे जनार्दन टेकावडे यांनी शंकरराव कोल्हे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला होता. ही निवडणूक आजही जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील सर्वात थरारक लढतींपैकी एक मानली जाते.

यानंतर यशवंतराव गडाख यांची एंट्री झाली आणि त्यांनी सलग दोन वेळा विजय मिळवला. 2008 मध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जयंत ससाणे यांच्यावर अपक्ष उमेदवार अरुणकाका जगताप यांनी धक्कादायक विजय मिळवत संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाला हादरा दिला.

यानंतर राष्ट्रवादीच्या तिकिटावरही त्यांनी विजय मिळवत आपली ताकद कायम ठेवली. मंडळी, गेल्या 60 वर्षांत या मतदारसंघाने 9 आमदार दिले आणि आता या मतदारसंघाचा दहावा आमदार कोण होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button