
६ खासदारांचे पक्षांतर झाले… पण आता खरी राजकीय लढाई सुरू होणार आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. मात्र या घडामोडीनंतर ठाकरे गटानेही आक्रमक भूमिका घेतली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बंडखोर खासदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र पाठवण्याची तयारी सुरू आहे. पक्षाने बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहणे, व्हीपचे पालन न करणे आणि कारणे दाखवा नोटीसला उत्तर न देणे, या मुद्द्यांचा आधार घेत कारवाईची मागणी केली जाऊ शकते.
एका बाजूला शिंदे गटाने हा मोठा राजकीय विजय मानला असताना, दुसऱ्या बाजूला ठाकरे गट आता कायदेशीर आणि संसदीय लढाईसाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणात पुढे काय होणार?
खासदारांची सदस्यता धोक्यात येणार की त्यांना दिलासा मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तुमच्या मते अपात्रतेची कारवाई व्हायला हवी का? मत नक्की सांगा.





