
दहावी किंवा बारावीनंतर कोणता कोर्स निवडायचा? इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट की एआयसारख्या नव्या क्षेत्रात करिअर करायचं ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता एका ठिकाणी मिळणार आहेत!
अहिल्यानगरमध्ये ६ आणि ७ जून रोजी पोलिस लॉन्स, न्यू आर्ट्स कॉलेजसमोर आयोजित करण्यात आलेल्या ‘सकाळ विद्या एक्स्पो २०२६’मध्ये विद्यार्थ्यांना आणि पालकांना थेट तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.
या एक्स्पोमध्ये करिअर गाईडन्स, नवीन शैक्षणिक धोरण, एआयच्या युगातील शिक्षण, तसेच विविध करिअर संधींवर खास सेमिनार होणार आहेत. प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर, डॉ. अजयकुमार ठाकूर, डॉ. सर्जेराव निमसे आणि प्रा. अमित ताले यांसारखे तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांबाबत सविस्तर माहिती येथे मिळेल. प्रवेश पूर्णपणे मोफत असून प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत खुले राहणार आहे. नक्कीचं करिअरचा योग्य निर्णय घ्यायचा असेल, तर हा एक्स्पो नक्की भेट द्या !





