Latest

भारतातून ATM होणार हद्दपार ? डेबिट कार्डचा वापर 44 टक्क्यांनी घटला !

मंडळी, तुम्ही शेवटचं ATM मधून पैसे कधी काढले होते ? कदाचित, आपल्यापैकी अनेकांनी बरेच दिवस झालेत तरी ATM मशीनमधून कॅश काढली नसेल. कारण, भारतात आता लोकांच्या हातात कार्डपेक्षा मोबाईल जास्त दिसतोय. यामुळे गेल्या दोन वर्षांत डेबिट कार्ड म्हणजेचं ATM कार्डचा वापर तब्बल 44 टक्क्यांनी कमी झाला आहे.

RBI च्या अहवालानुसार, 2023-24 मध्ये ATM आणि Debit Card व्यवहार 22,860 लाख होते. ते 2025-26 मध्ये थेट 12,802 लाखांवर आले आहेत. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे UPI. आज किराणा, भाजी, चहा, पेट्रोल, वीज बिल, अगदी छोट्या पेमेंटसाठीही लोक Google Pay, PhonePe आणि Paytm वापरत आहेत.

UPI व्यवहारांमध्ये 84% वाढ झाली असून डिजिटल पेमेंट आता लोकांची पहिली पसंती बनली आहे. त्यातच अनेक बँका आता Cardless Cash Withdrawal सुविधा देत आहेत. म्हणजे ATM मधून पैसे काढण्यासाठी कार्डचीही गरज नाही. दरम्यान, Credit Card वापर मात्र वाढतोय.

Cashback, Rewards आणि EMI मुळे लोक Credit Card कडे वळत आहेत. तर मग मंडळी तुमच्या मते भविष्यात ATM पूर्णपणे बंद होतील का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button