Latest

श्रीगोंद्यातील दोन भावांवर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी गजाआड…; आरोपींना थेट गुजरातमधून ठोकल्यात बेड्या ! नेमक काय आहे प्रकरण?

श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे-चिंचळा रस्त्यावर डंपरच्या हप्त्यावरून झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या तपासात बेलवंडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

चारचाकी वाहन अडवून दोन भावांवर कोयता, तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला होता. मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरचा हप्ता न दिल्याच्या कारणातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

या प्रकरणात यापूर्वी पाच आरोपींना अटक झाली होती. मात्र, मुख्य आरोपी गणेश तुकाराम गायकवाड हा फरार होता. तो गुजरातमधील भरूच जिल्ह्यात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बेलवंडी पोलिसांचे पथक गुजरातमध्ये पोहोचले आणि पाठलाग करून गणेश गायकवाडला अटक केली.

या गुन्ह्यात आतापर्यंत सहा जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. उर्वरित आरोपींचाही शोध सुरू असून, त्यांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवळकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button