Latest

चिंताजनक ! कॅन्सरचा धोका वाढला, रुग्णसंख्येत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी; आयसीएमआरच्या नव्या आकडेवारीने राज्यात खळबळ…

महाराष्ट्रासाठी कॅन्सरबाबत चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. आयसीएमआर-एनसीडीआयआरच्या अंदाजानुसार, २०२५ मध्ये राज्यात १ लाख ३० हजार ४६५ नवीन कॅन्सर रुग्ण आढळल्याचा अंदाज आहे. २०२४ मध्ये हा आकडा १ लाख २७ हजार ५१२ होता. म्हणजेच एका वर्षात अंदाजे २,९५३ रुग्णांची वाढ झाली.

देशातील राज्यनिहाय आकडेवारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक २ लाख २६ हजार १२५ नवीन रुग्णांचा अंदाज आहे.

दरम्यान, भारतात १९९० ते २०२३ या तीन दशकांत दर एक लाख लोकांमागे कॅन्सरचे प्रमाण ८४.८ वरून १०७.२ पर्यंत वाढल्याचा अंदाज आहे.

तंबाखू, मद्यपान, अस्वास्थ्यकर आहार आणि काही चयापचयाशी संबंधित जोखीम घटक कॅन्सरच्या वाढत्या ओझ्याशी संबंधित असल्याचे केंद्र सरकारने नमूद केले आहे. आज ‘रोज डे’निमित्त कॅन्सरशी लढणाऱ्या रुग्णांना प्रेम, आधार आणि मानसिक बळ देण्याचा संदेशही दिला जातो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button