Latest

पंतप्रधान मोदींच्या नावावर किती संपत्ती ? घर, शेती की दुकान…जाणून घ्या संपूर्ण हिशोब !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीबाबतची 31 मार्च 2026 पर्यंतची अधिकृत माहिती समोर आली आहे. PMOच्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांची घोषित एकूण संपत्ती 4 कोटी 1 लाख 60 हजार 999 रुपये इतकी आहे.

विशेष म्हणजे, त्यांच्या नावावर शेतजमीन, बिगरशेती जमीन, व्यावसायिक मालमत्ता किंवा निवासी घर असल्याची नोंद नाही. त्यांच्या संपत्तीमध्ये सर्वाधिक रक्कम बँक ठेवी आणि मुदत ठेवींमध्ये आहे.

SBIच्या गांधीनगर शाखेतील खात्यात 3 हजार 562 रुपये जमा आहेत, तर एफडी आणि एमओडीमध्ये सुमारे 3 कोटी 79 लाख 76 हजार रुपये आहेत. याशिवाय त्यांच्याकडे 34 हजार 429 रुपये रोख रक्कम आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच NSCमध्ये 10 लाख 24 हजार 724 रुपये आहेत.

मोदींच्या नावावर चार सोन्याच्या अंगठ्या असून त्यांचे वजन सुमारे 45 ग्रॅम आहे. या सोन्याची अंदाजे किंमत 4 लाख 58 हजार 864 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही माहिती 31 मार्च 2026 रोजीच्या घोषित मालमत्तेवर आधारित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button