Latest

सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज ! पेट्रोलपेक्षा २० रुपयांनी स्वस्त, केंद्र सरकारचं नवं E85 इंधन लॉन्च

मंडळी, दररोजच्या पेट्रोलच्या खर्चाने हैराण झाला आहात? मग ही बातमी तुमच्यासाठीचं आहे. केंद्र सरकारने आता ‘E85’ नावाचं नवीन इंधन बाजारात आणलं आहे, जे साध्या पेट्रोलपेक्षा प्रतिलिटर तब्बल २० रुपये स्वस्त असणार आहे. हरदीपसिंह पुरी यांनी दिल्लीमध्ये या इंधनाचे अनावरण केले. E85 इंधनामध्ये ८० ते ८५ टक्के इथेनॉल आणि उर्वरित पेट्रोल असते.

मात्र, हे इंधन फक्त फ्लेक्स-फ्यूल वाहनांमध्येच वापरता येणार आहे. सुरुवातीला देशातील ४८ सरकारी पेट्रोल पंपांवर हे इंधन उपलब्ध होणार आहे. सरकारचे लक्ष्य २०२७ पर्यंत ५ हजार पेट्रोल पंपांवर E85 उपलब्ध करण्याचे आहे.

सरकारच्या मते, या इंधनामुळे पेट्रोलवरील खर्च कमी होईल, परकीय चलनाची मोठी बचत होईल आणि प्रदूषणातही घट होईल. तसेच इथेनॉल उत्पादन वाढल्यामुळे ऊस आणि इतर पिकांमधून शेतकऱ्यांनाही मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

म्हणजेच, E85 हे इंधन ग्राहक, पर्यावरण आणि शेतकरी — तिन्हींसाठी फायदेशीर ठरू शकते. पण केंद्र सरकारने लॉन्च केलेल्या या नवीन इंधनाबाबत तुम्हाला काय वाटतं ? हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button